विकास आमटेंना चंद्रपूर भूषण पुरस्कार

बाबा आमटे यांचे पुत्र डॉक्टर विकास आमटे यांना यंदाचा चंद्रपूर भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सरकारी धोरणांवर जोरदार टीका केली.

Updated: Jan 2, 2012, 09:15 AM IST

झी  २४ तास वेब टीम, चंद्रपूर

बाबा आमटे यांचे पुत्र डॉक्टर विकास आमटे यांना यंदाचा चंद्रपूर भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सरकारी धोरणांवर जोरदार टीका केली.

देशभर लोकपालवरून वादळ सुरु असतानाच टीम अण्णांमधल्या एक सदस्य मेधा पाटकर यांनी सामान्यांना न्याय देणारी धोरणं सरकारनं आखावीत अशी मागणी केली आहे. योजना आखताना वंचितांना विचारात घेतलं जात नसल्याची खंत पाटकर यांनी व्यक्त केली. विकास आमटे यांना चंद्रपूर भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्या कार्यक्रमात मेधा पाटकर यांनी सामान्य लोकांनी एकत्र येऊन संघटीत ताकद दाखवण्याचं आवाहन केलं.

सरकारनं जनतेशी संवाद साधून त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करुन घ्यावं अशी अपेक्षा मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. लवासा प्रकरणी सरकारच्या धोरणावरही त्यांनी कडाडून टीका केली. केवळ व्यक्तीच नाही तर एखाद्या गावाची संस्कृती नाहीशी करण्याची संधी राजकारणी सोडत नसल्याचा आरोप त्यांनी केला

[jwplayer mediaid="22383"]