कसा मिळतो बनावट शस्त्र परवाना

पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्येच खाबूगिरी सुरू असल्याचं उघड झालाय. चक्क पोलीस आयुक्तलयांच्या कार्यालयातूनच बनावट शस्त्र परवाना मिळाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

Updated: Jul 21, 2012, 10:10 PM IST

www.24taas.com, पुणे 

 

पुण्यातून धक्कादायक बातमी... पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्येच खाबूगिरी सुरू असल्याचं उघड झालाय. चक्क पोलीस आयुक्तलयांच्या कार्यालयातूनच बनावट शस्त्र परवाना मिळाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

 

कैलास भोसले आणि त्याचा साथीदार अजय अगरवाल सध्या बंडगार्डनच्या पोलीस कोठडीत आहेत. कैलास हा पोलीस आयुक्तालयात शस्त्र परवाना विभागात कारकून आहे तर अजय त्याचा मित्र होता. पुण्यातले उद्योजक वसंत कोकणे यांना शस्त्र परवाना हवा होता. मात्र पोलिसांनी काही कारणाने तो नाकारला.  अजयने त्यांच्या परवान्यासाठी आयुक्तालयातल्या कैलासशी संपर्क साधला. भोसलेनं ४० हजार रुपयांच्या मोबदल्यात शस्त्र परवाना दिला. मात्र, हा शस्त्र परवाना बनावट असल्यची शंका कोकणे यांना आली. त्यांनी पोलीस आयुक्तालायाशी संपर्क साधल्यानंतर त्यांची शंका खरी ठरली आणि बनावट शस्त्र परवाना प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

कैलास भोसले आणि अजय अगरवाल यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे,  आणखी कुणाला अशा प्रकारे बनावट परवाने देण्यात आले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

.