लतादीदींचे आज ८२व्या वर्षात पदार्पण

Last Updated: Wednesday, September 28, 2011 - 15:01

झी २४ तास वेब टीम, मुंबई

गेली ७० वर्षं आपल्या स्वरांनी  संपूर्ण जगाला मोहित करणाऱ्या लता मंगेशकर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. भारताची गानसम्राज्ञी आज ८२व्या वर्षात पदार्पण करत आहे. दीदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जगभरातील चाहत्यांचा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सम्राज्ञीने गायलेली गाणी आजही चिरतरुण आहेत. लता दीदींनी आजवर ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सर्वात जास्त गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्डही लता मंगेशकर यांच्या नावावर आहे. लता दीदींच्या आजवरच्या कारगिरीला सलाम म्हणून सरकारनेही २००१मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार “भारतरत्न”ने सन्मानित केलं.
गेल्या अनेक वर्षांपासून लतादीदी आपला वाढदिवस कुटुंबियासोबत अत्यंत साधेपणाने  साजरा करत आहेत. लतादीदींसाठी हा वाढदिवस आणखी खास असणार आहे. कारण आज अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांना पहिल्या हृदयनाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

हृदयनाथ मंगेशकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधून 'हृदयेश आर्टस्'तर्फे दरवर्षी एक लाखाचा 'हृदयनाथ पुरस्कार' संगीतक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणार आहे. पहिलाच पुरस्कार लतादीदी यांना जाहीर झाला आहे. आज लतादीदींच्या वाढदिवासाच्या दिवशी षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात तो प्रदान करण्यात येणार आहे.First Published: Wednesday, September 28, 2011 - 15:01


comments powered by Disqus