वीना.. कपड्यां'विना'

‘एफएचएम इंडिया’ या मासिकावरील मुखपृष्ठसाठी असलेल्या नग्न छायाचित्रामुळे यावेळी वीना मलिक पुन्हा चर्चेत आली आहे. त्यात आणखी आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे या फोटोत असणारा तिच्या दंडावरचा ISI चा टॅटू.

Updated: Dec 2, 2011, 05:25 PM IST

काही लोक चर्चेत राहाण्यासाठी काय वाट्टेल ते करतात हेच खरं. पाकिस्तानी सेलिब्रेटी वीणा मलिक ही पुन्हा चर्चेत आली आहे. ‘एफएचएम इंडिया’ या मासिकावरील मुखपृष्ठसाठी असलेल्या तिच्या नग्न छायाचित्रामुळे यावेळी वीणा मलिक पुन्हा चर्चेत आली आहे. त्यात आणखी आक्षेपार्ह म्हणावी अशी गोष्ट म्हणजे या फोटोत असणारा तिच्या दंडावरचा ISI चा टॅटू.

 

यावर वीणाने अशी प्रतिक्रिया दिलीय की हा फोटो तिचा नाहीच. हा फोटो मुळात वेगळ्याच कोणाचा तरी असून त्या फोटोवर कुणीतरी
तिचा चेहरा जोडण्याचा चावटपणा केला आहे. ३३ वर्षीय वीणा मलिक भारतात आपल्या स्वयंवरासाठी आली असता म्हणाली, “मी कधीच कुणाला माझे नग्न फोटोज काढू दिले नाहीत. ज्या कुणी हा खट्याळपणा केलाय त्यांचवर माझा मॅनजर तसंच लीगल टीम केस करेल.”

 

मात्र, एफएचएम मासिकाचं संपादक कबीर शर्मा यांचं म्हणणं तर काही वेगळंच आहे. ते म्हणाले, “हे फोटोशुट २२ नोव्हेंबर रोजी मुंबईत करण्यात आलं होतं. या वेळचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही आमच्याकडे आहे. याचबरोबर दस्तुरखुद्द वीणा मलिकचा इमेलही आमच्याकडे आहे, ज्यात तिने म्हटलंय की मला माझे फोटोज खुप आवडलेत. हे फोटोज कव्हर पोजवर कधी येतायत, याचीच मी वाट बघतेय.”

सध्या या फोटोजनी भारतीयंबरोबरच पाकिस्तानी लोकांची झोपही उडवली आहे, हे मात्र खरं.