एकनाथ खडसेंच्या मुलाने डोक्यात गोळी झाडली

भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांने डोक्यात गोळी झाडून घेतली. गंभीर जखमी निखिल खडसेंना रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 1, 2013, 11:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,जळगाव
भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांने डोक्यात गोळी झाडून घेतली. गंभीर जखमी निखिल खडसेंना रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये ही घटना घडलीय. निखिल खडसे यांनी डोक्यात रिव्ह़ॉल्व्हरची गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्यावर गणपती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. त्यांच्यावर उद्या दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निखल खडसे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. राजकीय वादातून निखिल यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.निखिलने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. निखिल गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

निखिलने या आधी विधानपरीषदेची निवडणुकही लढविली होती. मात्र यामध्ये त्याला पराभवाला सामोरे जावे लागले होते. राजकीय वादातून त्यांने हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मात्र, अधिकृत कारण समजू शकलेले नाही.
२०१०मध्ये विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत निखिल खडसे यांचा पराभव झाला होता. निखिल खडसे यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच अनेक भाजप नेते जळगावच्या दिशेने निघाले आहेत. आत्महत्येसाठी निखिल यांनी वापरलेल्या रिव्हॉल्वरचा त्यांच्याकडे परवाना होता की नाही याबाबत काही समजू शकलेले नाही.