जॉन अब्राहमचा महिलेला हवाय शुक्राणू

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने आगामी चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता होण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने त्याने पावले उचलली आहेत. मात्र, ज्या विषयावर चित्रपट होणार आहे, त्याच विषयाचा धागा एका महिलेने पकडला आहे. तिचे चक्क जॉन अब्राहमचा शुक्राणू (स्पम) मागितला आहे. या महिलेला गर्भधारणेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तिलाजॉनचा स्पम हवा आहे.

Updated: Apr 18, 2012, 05:57 PM IST

www.24taas.com, मुंबई

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने आगामी चित्रपटाच्या माध्यमातून  निर्माता होण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने त्याने पावले उचलली आहेत. मात्र, ज्या विषयावर चित्रपट होणार आहे, त्याच विषयाचा धागा एका महिलेने पकडला आहे. तिचे चक्क  जॉन अब्राहमचा शुक्राणू (स्पम) मागितला आहे. या महिलेला गर्भधारणेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तिलाजॉनचा स्पम हवा आहे.

जॉन  ‘विक्की डोनर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा विषय आहे. एकाद्या पुरूषाने आपला शुक्राणू दान करण्याची कल्पना मांडली आहे. याच कल्पनेवर आधारीत हा सिनेमा आहे. मात्र, आपण  करीत असलेल्या सिनेमावरून अडचणीत येण्याची शक्यता जॉन अब्राहमची गावी नसेल. वास्तवात ही कल्पना वास्तवात आल्याने जॉन अब्राहम आता काय भूमिका घेतो याकडे लक्ष लागले आहे.

ज्या महिलेने जॉन अब्राहमकडे शुक्राणूची मागणी केली त्या महिलेला मागील काही काळापासून मुल झालेले नाही. ती मुलाच्या प्रतिक्षेत आहे. आता तिला कृत्रिम गर्भधारणा करावयाची आहे. जॉनच्या  ‘विक्की डोनर’ या चित्रपटावरून तिला कल्पना सूचली आणि तिने चक्क  जॉनचा स्पम मागितला आहे. या महिलेला प्रेरणा मिळाली ती जॉनकडूनच . जॉन आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात पुरूषांनी आपला शुक्राणू दान करण्याची कल्पना मांडली. त्यावेळी ही महिला उपस्थित होती.

जॉनने जा कल्पना मांडली त्या कल्पनेवरून या महिलेला प्रोत्साहन मिळाले. जॉनेने ही कल्पना मांडताना म्हणाला की, शुक्राणू दान करण्याबाबत माझा विश्वास  आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून महिलेला मूल होत नसल्याने जॉनचा आधार तिला मिळाला आणि तिने कृत्रिम गर्भधारण करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. त्यासाठी तिला आता जॉनची मदत हवी आहे. जॉन हा महिलांमध्ये आवडता आहे. तसेच जॉनने युवकांना शुक्राणू देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे. आपण  शुक्राणू का दान करू शकत नाही, असा सवालही उपस्थित केला आहे.