टीम इंडियाही गडगडली, ऑसी होणार डोईजड?

चौथ्या आणि अखेरच्या दिल्ली टेस्टच्या दुस-या दिवसअखेर भारत केवळ 4 रन्सचीच आघाडी घेऊ शकलाय. दुस-या दिवसअखेर टीम इंडिया 8 विकेट्स गमावत 266 रन्सवर खेळत होती.

Updated: Mar 23, 2013, 06:42 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
चौथ्या आणि अखेरच्या दिल्ली टेस्टच्या दुस-या दिवसअखेर भारत केवळ 4 रन्सचीच आघाडी घेऊ शकलाय. दुस-या दिवसअखेर टीम इंडिया 8 विकेट्स गमावत 266 रन्सवर खेळत होती. दिवसअखेर भुवनेश्वर कुमार 10 रन्सवर नॉट आऊट आहे. टीम इंडियाच्या ओपनर्सने टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली मात्र मिडल ऑर्डने निराशाजनक कामगिरी केल्यामुळे दिवसअखेर भारताला फारशी आघाडी घेतला आली नाही.
कोहली 1, सचिन 32, अजिंक्य 7, धोनी 24 , जाडेजा 47 रन्सवर आऊट झाले. कांगारुंकडून स्पिनर नाथन लियॉनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर पिटर सिडल, जेम्स पॅटिनसन आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाची इनिंग 262 रन्सवर आटोपली.
दुस-या दिवशी चांगल्या सुरुवातीनंतर टीम इंडियाची मिडल ऑर्डर कोसळली. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने भारताला 108 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप करुन दिली. यानंतर कांगारुंचा स्पिनर नाथन लियॉनने भारतीय बॅट्समनला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवल. कोहली 1, सचिन 32, रहाणे 7 तर धोनी 24 रन्सवर आऊट झाला. कांगारु स्पिनर नाथन लियॉनने 4 विकेट्स घेतल्या. चार टेस्टच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने 3-0ने विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे कांगारुंना क्लिन स्विप देण्याची धोनी एँड कंपनीला ही सुवर्णसंधी आहे.