पुणे पोलिसांचं गौडबंगाल, 'उचलेगिरी'

पुण्याल्य़ा वारजे माळवाडी पोलिसांनी सोमावारी पहाटे एक कारवाई केली..मात्र त्या कारवाईवर आता एकच चर्चा सुरु झालीय.. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एका संशयीत वाहनचोराला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून तीन वाहनं जप्त केली...पण त्या तीन वाहनांपैकी एक बाईक मात्र चोराने चोरलीच नव्हती..वाहन चोरीला गेलं नसताना पोलिसांनी ती इमारतीतल्या पार्किंगमधून उचलून नेली.....तसेच त्यांनी बाईक मालकाला त्याची साधी कल्पनाही दिली नाही...पण सीसीटीव्हीच्या नजरेतून पोलिसांचा तो कारनामा सूटू शकला नाही.

Updated: Apr 3, 2012, 10:47 PM IST

www.24taas.com, पुणे

 

 

पोलीस आणि वाद हे जणू समिकरणचं बनलं आहे...कोणत्या न कोणत्या कारणामुळं पोलीस वादात सापडतात...पुण्यातल्या वारजे पोलीस स्टेशनचे पोलिसही वादात सापडलेत...त्यांनी पहाटच्या वेळी एका वाहनचोराला सोबत घेऊन केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय...ती कारवाई नेमकी काय होती?....कारवाई करतांना पोलिसांकडून कायद्याचं उल्लंघन झालं का ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, पुणे पोलिसांचं गौडबंगालमध्ये.

 

 

पुण्याल्य़ा वारजे माळवाडी पोलिसांनी सोमावारी पहाटे एक कारवाई केली..मात्र त्या कारवाईवर आता एकच चर्चा सुरु झालीय.. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एका संशयीत वाहनचोराला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून तीन वाहनं जप्त केली...पण त्या तीन वाहनांपैकी एक बाईक मात्र चोराने चोरलीच नव्हती..वाहन चोरीला गेलं नसताना पोलिसांनी ती इमारतीतल्या पार्किंगमधून उचलून नेली.....तसेच त्यांनी बाईक मालकाला त्याची साधी कल्पनाही दिली नाही...पण सीसीटीव्हीच्या नजरेतून पोलिसांचा तो कारनामा सूटू शकला नाही.

 

 

 

अविनाश देशमुख यांची बाईक हरवली आणि दीड तासात सापडलीही ...पण जेव्हा अविनाश बाईक हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धक्कादायक अनुभव आला...वाहन हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आपल्याकडं लाचेची मागणी केल्याचा आरोप अविनाश यांनी केलाय.. पार्किंगमध्ये उभी असलेली अविनाश देशमुख यांची  बाईक रात्री हरवली आणि पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर ती अवघ्या दिड तासात त्यांना परत मिळाली...पण या घटने दरम्यानं त्यांना पोलीस खात्यात खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचारा सामना करावा लागला...तक्रार दाखल करण्यासाठी आपल्याकडं लाचेची  मागणी केल्याचा आरोप अविनाश यांनी केला आहे.

 

 

 

अविनाश यांच्याकडं पैशाची मागणी करण्यात आली...या प्रकरणी त्यांनी पोलिसांकडं तक्रार केली असून त्यावर चौकशी करुन कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधिका-याने सांगितल.एफआयआरसाठी पैसे मागणा-यांवर कारवाई करण्याचे संकेत फडतरेंनी दिलेत...पण चोरी न झालेलं वाहन घेऊन जाणा-या पोलिसांच काय असा सवाल या प्रकरणातील तक्रारदाराच्या वकीलांनी  केला आहे. अविनाश देशमुख यांची तक्रार नोंदवून घेतांना अज्ञात इसमांनी बाईक चोरुन नेल्याचं  पोलिसांनी नमुद केलं आहे..यापार्श्वभूमीवर संबंधीत पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराच्या वकिलांनी केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार वाहनचोर विठ्ठल राठोड ती बाईक चोरण्याच्या बेतात होता... आणि त्याचा तो डाव हाणून पाडण्यासाठीच पोलिसांनी ती बाईक ताब्यात घेतल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय...पण पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय...याप्रकरणाने अनेक प्रश्नांना जन्म दिला असून त्याची उत्तर देतांना पोलिसांची दमछाक झाली आहे.

 

 

 

वाहनचोराच्या सांगण्यावरुन पार्किंगमधून पोलीस बाईक घेऊन गेले...पण त्याची साधी चौकशी त्यांनी त्या इमारतीतल्या रहिवाशांकडं केली नाही...या करवाईत पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली...पण सीसीटीव्हीमुळं त्यांचं पितळ उघडं पडलं...या सगळ्या कारवाईवर पोलिसांनी आपली  बाजू मांडलीय...पण पोलिसांनी दिलेला तर्क हैराण करणारा आहे.

 

 

 

तन्मय पुरी सोसायटीतील पार्किंगमध्ये उभी असलेली अविनाश देशमुख यांची बाई