निवडणुकीत अशी ही पुणेरी पाटी!

निवडणूकांच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर जरी वाढला असला, तरी पारंपारिक प्रचाराला अजूनही तितकंच महत्व आहे. त्यामुळे निवडणूकांच्या काळात फेलक्स बँनर आणि कटआऊटसना मोठी मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात असणारे फ्लेक्स व्यवसायिकही निःपक्षपातीपणे सर्वच पक्षांचं काम करताना दिसतायत.

Updated: Apr 8, 2014, 06:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
निवडणूकांच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर जरी वाढला असला, तरी पारंपारिक प्रचाराला अजूनही तितकंच महत्व आहे. त्यामुळे निवडणूकांच्या काळात फेलक्स बँनर आणि कटआऊटसना मोठी मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात असणारे फ्लेक्स व्यवसायिकही निःपक्षपातीपणे सर्वच पक्षांचं काम करताना दिसतायत.
मुळातच पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पाट्यांमध्ये सध्या आणखी एका पुणेरी पाटीनं भर पाडलीय. ही पाटी आहे पुण्यातल्या  शनिवार पेठेतल्या एका दुकानाची. पुण्यातले शेखर देडगावकर यांच्या या दुकानामध्ये हा सर्वपक्षीय समभाव दिसून येतोय. त्याचं कारणही तसंच आहे. पुण्यातलं देडगावकर कुटुंब  ६० वर्षांहून जास्त काळ प्रिंटींगच्या व्यवसायात कार्यरत आहे. त्यावेळी फ्लेक्स प्रिंटींग हा प्रकारही अस्तित्वात नव्हता.

तसेच इलेक्शनच्या काळात कापडी बोर्ड आणि भिंतीवर रंगविले जाणारे फलक हेच उमेदवाराच्या प्रचाराचं माध्यम होतं. मात्र काळ बदलला तसा  कापडी बोर्डची जागाही बँनर्सनं घेतली आणि देडगावकरांनीही त्यांच्या व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केलीय. एवढंच नाही तर प्रचारासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधून काढल्यात.
 
पुण्याचे सगळ्या पक्षांचे उमेदवार देडगावकरांकडूनच प्रचार साहित्य बनवून घेतात. देडगावकरही कुणालाही नाराज करत नाही. आमची मतं तुम्हांलाच असं सांगत  देडगावकरही हे काम नि:पक्षपातीपणे करतायत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.