सामनातील टीकेला गडकरींचं उत्तर

राज ठाकरे यांची भेट घेतल्याप्रकरणी शिवसेनेनं सामना मुखपत्रात केलेल्या टीकेला भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी उत्तर दिलंय.

Updated: Mar 6, 2014, 04:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज ठाकरे यांची भेट घेतल्याप्रकरणी शिवसेनेनं सामना मुखपत्रात केलेल्या टीकेला भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी उत्तर दिलंय.
काँग्रेसविरोधी मतांच विभाजन टळलं तर याचा फायदा एनडीए आणि यातल्या इतर घटक पक्षांना होईल, त्यामुळेच राज यांची भेट घेतली असा खुलासा गडकरी यांनी केलाय.
मात्र या विषयावर सामानामधून झालेली टीका दुर्भाग्यपूर्ण असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
राज ठाकरे यांची भेट घेतल्याबद्दल शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला होता..गडकरी यांनी राज यांना महायुतीत आणण्याचा प्रयत्न करु नये महायुतीला मनसेची गरज नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली.
दुसरीकडे विलिनीकरणास विरोध
भाजपमध्ये नवे पक्ष आणि नेते सहभागी होण्यास सुरुवात झाल्यानंतर या विलनीकरणास भाजप नेत्यांचाच विरोध असल्याचं चित्र समोर येतंय.
कर्नाटकातले नेते बी.एस. श्रीरामुलू यांच्या बीएसआर काँग्रेसचा भाजपमध्ये विलिनीकरणास सुषमा स्वराज यांनी विरोध केलाय.
याबाबत त्यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना पत्र लिहून विरोध दर्शवलाय. कर्नाटकातले वादग्रस्त रेड्डी बंधुंचे समर्थक असलेल्या श्रीरामुलू यांच्या भाजप प्रवेशास कर्नाटक भाजपनं संमती दिलीय.
तसंच त्यांना बेल्लारीमधून लोकसभेचं तिकीट देण्याचीही तयारी दाखवलीय. मात्र आता स्वराज यांच्या ठाम विरोधामुळे भाजपासमोर पेच निर्माण झालाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.