नरेंद्र मोदी शपथ सोहळ्यात उद्धव-राज ठाकरे

गुजरात भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतायेत. २६ डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या प्रसंगी महाराष्ट्रातून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे खास या शपथविधीला उपस्थित आहेत. राज आणि मोदी यांच्यातील दृढ संबंध यापूर्वीही दिसून आले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 26, 2012, 12:11 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
गुजरात भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतायेत. २६ डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या प्रसंगी महाराष्ट्रातून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे खास या शपथविधीला उपस्थित आहेत. राज आणि मोदी यांच्यातील दृढ संबंध यापूर्वीही दिसून आले आहेत.
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल मैदानात त्यांचा शपथविधी सोहळा होतोय. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीये. नरेंद्र मोदी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनं ११५ जागा जिंकून बहुमत मिळवलयं. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये शपथविधी सोहळ्यासाठी मोठा जनसमुदाय गोळा झालाय.
या जनसमुदायाच्या साक्षीनं मोदी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी देशातले भाजपच्या मित्रपक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. महाराष्ट्रातून भाजप नेते गोपीनाथ मुंडे, उदयोगपती सुब्रतो राय हेदेखील उपस्थित आहेत.

राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित हेही आहेत. तर उद्धव यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, खासदार अनंत गिते आहेत. राज ठाकरे आज अहमदाबाच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार असल्यानं ऑगस्टच्या गुजरात दौ-याला उजाळा मिळालाय. राज ठाकरेंच्या मनसे आणि भाजपची युती नाहीये. तरीही राज ठाकरेंना निमंत्रण असल्यानं भविष्यातील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरु झालीये.

६२ वर्षीय मोदी गुजरातमध्ये २००१पासून राज्य करीत आहेत. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची सत्ता संभाळली होती. त्यांनी २००७ मध्ये गुजरातची कमान हाती घेतली. सर्वाधिक काळ राज्य चालविण्याचा मान नरेंद्र मोदींकडे जातो. याच वर्षी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना २,०६३ दिवस पूर्ण केलेत. २००७ मध्ये ते दुसऱ्यांदा त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय संपादन केला. त्यानंतर त्यांनी पाठिमागे वळून पाहिले नाही. भाजपची घौडदौड सुरूच राहिली आहे. विकासाच्या मुद्द्यावर वारंवार निवडून येणाऱ्या नरेंद्र मोदींची राज ठाकरेंनी नेहमीच तारीफ केली आहे.
मोदींना विकासाचे राजदूत म्हणत राज ठाकरेंनी ३ ते १२ ऑगस्ट २०११ ला गुजरातचा अभ्यास दौराही केला होता. मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या विकासाचं अवलोकन करून तसा विकास महाराष्ट्रात कसा करता येईल, यावर मोदींशी राज यांनी प्रदीर्घ चर्चाही या दौऱ्यात केली होती.