भारताचा पाकवर १० धावांनी विजय

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, January 6, 2013 - 19:57

www.24taas.com, नवी दिल्ली
टीम इंडियाने पाकिस्ता‍नला १५७ धावांवर गारद करून 10 धावांनी रोमांचक विजय मिळवला. त्यामुळे भारताने व्हाइईटवॉश टाळला आहे.
शेवटच्या काही षटकांत भारताने चांगली गोलंदाजी करून सामना खिशात टाकला. उमर गुल आणि मोहम्मलद हाफिज मैदानात होते त्यावेळी पाक ३० चेंडुंमध्ये २५ धावांची गरज होती. या ५ षटकांमध्येा शमी अहमद, रविंद्र जडेजा आणि इशांत शर्मा यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. अखेरच्या२ दोन षटकांमध्येन पाकिस्ता‍नला विजयासाठी २३ धावांची गरज होती. त्यांवेळी इशांत शर्माच्यां गोलंदाजीवर हाफिजने दोन चौकार मारले. तसेच इशांतने एक वाईड आणि एक नो बॉल टाकला. त्यांतच नो बॉलवर इशांतने दुसऱ्या बाजुने मोहम्मयद इरफानला धावबाद करण्यातची मोलाची संधी दवडली. या चुका भारताला भोवतील असे वाटत होते. परंतु, ४९ व्याह षटकाच्यान पाचव्याे चेंडूवर ईशांतने हाफिजला बाद करुन मालिकेत १-२ अशी प्रतिष्ठा कायम राखली.
उमर गुल इशांत शर्माच्या गोलंदाजीवर ११ धावा काढून बाद झाला. उमर गुल पाकिस्तायनचा बाद होणारा सातवा फलंदाज होता. तत्पुार्वी, रविंद्र जडेजाने उमर अकमलला बाद करुन पाकिस्तसनला सहावा धक्काण दिला. जडेजाला समोर येऊन ड्राईव्ह् करण्यापच्याल प्रयत्नाजत उमर अकमल यष्टी चीत झाला. उमर अकमल २५ धावा काढून बाद झाला. तत्पुडर्वी, इशांत शर्माने शोएब मलिकला अप्रतिम इनस्विंगरवर पायचीत केले. शोएब ५ धावा काढून बाद झाला.
आर. अश्विनने पाकिस्तापनची चौथी विकेट घेतली. पाकिस्ताशनचा कर्णधार मिसबाह उल-हकला त्या५ने बाद केले. लेग स्लिपमध्येा मिसबाहचा झेल अजिंक्य् रहाणेने टिपला. मिसबाहने ३९ धावा काढल्याा. यापूर्वी चिवट नासिर जमशेदला पायचीत केले. जमशेदने ३४ धावा काढल्याे. भारतीय वेगवान गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली.
भुवनेश्वेर कुमारने युनिस खानचा त्यालने त्रिफळा उडविला. तर त्याने सुरूवातीला कामरान अकमलला त्यावने शुन्यािवर पायचीत केले.

भारताची इनिंग-
पाकिस्‍तानविरुद्ध अखेरच्‍या वन डे सामन्‍यात भारताचा डाव 167 धावांवर संपुष्‍टात आला. रविंद्र जडेजा बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. त्‍याने 27 धावा काढल्‍या. सईद अजमलने 5, मोहम्‍मद इरफानने 2, जुनैद खान, उमर गुल आणि मोहम्‍मद हाफिजने प्रत्‍येकी 1 मोहरा टिपला.
कर्णधार महेंद्रसिंग धोनी 36 धावा काढून बाद झाला. बॅटींग पॉवर प्‍लेमध्‍ये फटकेबाजी करुन धावगती वाढविण्‍याचा त्‍याचा इरादा होता. परंतु, गुलच्‍या चेंडूवर तो पॉईंटवर झेलबाद झाला. त्‍याने 36 धावा काढल्‍या. जेमतेम 111 धावांवर भारताचे 6 फलंदाज बाद झाले होते.
सईद अजमलने लागोपाठच्‍या चेंडुंवर सुरेश रैना आणि आर. अश्विनला पायचीत केले. रैना कमनशीबी ठरला. चेंडु त्‍याच्‍या बॅटची कड घेऊन पायावर आदळला होता. परंतु, पंचांनी त्‍याला बाद ठरविले. तो 31 धावा काढून बाद झाला. रैनाने धोनीसोबत 48 धावांची भागीदारी केली. त्‍यामुळे भारताला 100 धावांचा आकडा गाठता आला.
मोहम्‍मद हाफिजने युवराज सिंगचा त्रिफळा उडवून भारतला चौथा धक्‍का दिला. युवराज सिंग स्थिरावला होता. त्‍याने काही चांगले फटकेही मारले. परंतु, हाफिजच्‍या फिरकीवर तो फसला. युवराजच्‍या अपेक्षेपेक्षा चेंडू जास्‍त वळला आणि ऑफ स्‍टंपला चाटून गेला. युवराजने 23 चेंडुंमध्‍ये 23 धावा काढल्‍या. युवराज बाद झाला त्‍यावेळी भारताच्‍या 4 बाद 63 धावा झाल्‍या होत्‍या.
टीम इंडियाने पाकिस्तानमसोर वनडे क्रिकेटमध्ये गुडघे टेकले आहे. २-०ने पाकिस्तान आघाडीवर आहे. आजच्या तिसऱ्या वनडेमध्ये निराशाजनक सुरूवात झाली. टीम इंडियाची पहिली विकेट अजिक्य रहाणे गेली. त्यांने चार रन्स केल्यात. पाकने दुसरी गौतम गंभीरचीही विकेट काढली. विराट कोहलीही चांगली कामगिरी न करता आऊट झाला.
रविवारी भारताने टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात वीरेंद्र सेहवागला विश्रांती देण्यात आलीय. असे असले तरी पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या वन-डे लढतीत प्रतिष्ठा राखणाऱ्यासाठी विजयाची नोंद करण्याचे आव्हान टीम इंडियापुढे आहे. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी पाठदुखीने त्रस्त आहे.

दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतीत भारताची मदार फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. गेल्या दोन सामन्यांत भारतीय फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. यापूर्वी, १९८३ मध्ये भारतावर मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध पाच शून्यने क्लिन स्वीपची नामुष्की ओढवली होती.
धोनी, गौतम गंभीर आणि विराट कोहली या दिल्लीकर फलंदाज काय

First Published: Sunday, January 6, 2013 - 12:34
comments powered by Disqus