दहशतवादी हल्ल्याचा डाव फसला, चार दहशतवाद्यांना अटक

उत्तराखंड दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं रुडकी इथून अखलाख समवेत आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक केलीय. 

Updated: Jan 20, 2016, 11:32 AM IST
दहशतवादी हल्ल्याचा डाव फसला, चार दहशतवाद्यांना अटक title=

नवी दिल्ली : उत्तराखंड दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं रुडकी इथून अखलाख समवेत आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक केलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांच्या निशानावर राजधानी दिल्ली - एनसीआर यांशिवाय हरिद्वारमध्ये भरणारं अर्धकुंभही होतं. मुख्य आरोपीचं नाव अखलाख असल्याचं म्हटलं जातंय. 

हरिद्वारमध्ये होणाऱ्या अर्धकुंभ दरम्यान मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता. या दहशतवाद्यांचा पठानकोट दहशतवादी हल्ल्याशीही संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. 

उल्लेखनीय म्हणजे, सोमवारी हरियाणाच्या मेवातमधून एक संशयित दहशतवादी अब्दुल शमी याला अटक करण्यात आली होती. हा दहशतवादी झारखंडच्या जमशेदपूरचा राहणारा आहे. हरियाणात शमी याला अटक केल्यानंतर पोलिसांच्या हाती या चार दहशतवाद्यांचे धागेदोरे लागले.... आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.