गाडीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच चिरडलं!

चंदीगड – मनाली नॅशनल हाय वे वरच्या एका नाक्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसानं एका गाडीला चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला पण, गाडी सरळ सरळ कॉन्टेबलला चिरडून पुढे निघून गेली. 

Updated: Sep 16, 2014, 02:31 PM IST
गाडीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच चिरडलं! title=

बिलासपूर : चंदीगड – मनाली नॅशनल हाय वे वरच्या एका नाक्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसानं एका गाडीला चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला पण, गाडी सरळ सरळ कॉन्टेबलला चिरडून पुढे निघून गेली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी जवळपास चार वाजता स्वारघाट पोलिसांची एक टीम एएसआय अश्वनी यांच्या नेतृत्वाखाली नाक्यावर आपली ड्युटी बजावत होती.

यावेळी, मनालीकडून सफरचंदांनी भरलेली एक जीप येताना दिसल्यानंतर पोलिसांनी या टीमला थांबवण्यासाठी इशारा केला. पण, गाडी थांबली नाही.

पोलिसांचा इशारा मोडतच भरधाव वेगात ही जीप पोलिसांच्या टीमकडे वळली. यामध्ये, कॉन्स्टेबल राजकुमार गाडीच्या खाली आला. तो या अपघातात गंभीररित्या जखमी झालाय.  

रोकना चाहा तो ड्राइवर ने कांस्टेबल पर ही गाड़ी चढ़ा दी। कांस्टेबल की टांग में चोटें आई हैं। उसे उपचार के लिए जिला अस्पताल में भर्ती किया गया है। 

या प्रकरणी पोलिसांनी, पंजाबच्या दोन युवकांना अटक केलीय. आत्माराम आणि रामलाल अशी या दोघांची नावं आहेत. घटनेदरम्यान वापरलेली जीपही ताब्यात घेण्यात आलीय. त्यांच्याविरोधात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.