सोने दरात मोठी घट, गेल्या तीन महिन्यातील निच्चांक

मागणीत झालेली घट आणि जागतिक बाजारपेठेवर असलेली मंदीचे सावट यामुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्लीत सोने ३३० रुपयांनी खाली आले असून गेल्या तीन महिन्यात सोने दर २६,१७० रुपये प्रती तोळा इतका खाली आलाय.

PTI | Updated: Jul 8, 2015, 04:44 PM IST
सोने दरात मोठी घट, गेल्या तीन महिन्यातील निच्चांक title=

नवी दिल्ली : मागणीत झालेली घट आणि जागतिक बाजारपेठेवर असलेली मंदीचे सावट यामुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्लीत सोने ३३० रुपयांनी खाली आले असून गेल्या तीन महिन्यात सोने दर २६,१७० रुपये प्रती तोळा इतका खाली आलाय.

औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून कमी झालेला उठाव यामुले चांदीच्या दरातही घट झालेली आहे. १५५० रुपयांनी दरात घट होऊन प्रति किलो ३४,४५० रुपये चांदीचा दर झालाय. चीनी बाजारातल्या तूफान विक्रीमुळे आज भारतीय बाजारातही मोठी पडझड झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही जोरदार आपटले. ग्रीसचं संकट आणि चीनमधली अस्थिरता यापासून गेले १५ दिवस भारतीय शेअर बाजार काहीसा अलिप्त वाटत होता. शेअर बाजारात झालेली घसरणही सोने बाजाराला फटका बसलाय. शेअर बाजारामुळे सोन्याच्या मागणीत घट झालेय.

सिंगापूरमध्ये सोने ०.७ टक्के घट होऊन १,१४७.३९ डॉलर प्रति औंसवर खाली आलेय. १८ मार्चनंतर हा सर्वात कमी दर आहे. तर चांदी १.७ टक्के घट होऊन १४.८१ डॉलर प्रति औंसवर आली आहे. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्ध आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ३३० रुपयांनी घटून क्रमश: २६,१७० आणि २६.०२० रुपये प्रति तोळा होती. हा भाव १७ मार्चला होता. मात्र, कालही सोन्यामध्ये घसरण झाली. ही घरसरण ७० रुपयांनी झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.