नव्या वर्षात सोनं आणखी स्वस्त होणार!

आगामी वर्षात सोन्याची झळाळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, सोन्यावरचं आयात शुल्क लवकरच कमी होण्याची चिन्ह आहेत. 

Updated: Dec 24, 2015, 04:25 PM IST
नव्या वर्षात सोनं आणखी स्वस्त होणार! title=

नवी दिल्ली : आगामी वर्षात सोन्याची झळाळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, सोन्यावरचं आयात शुल्क लवकरच कमी होण्याची चिन्ह आहेत. 

यंदाच्या अर्थसंकल्पात किंवा त्यापूर्वीच सोन्याच्या आयात शुल्कात ८ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. सध्या सोन्यावर १० टक्के आयात शुल्क आकारलं जातं. 

वाणिज्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या आयातीतल गेल्या वर्षीच्या तुलनेत ५१.५१ टक्के तर नोव्हेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६.४८ टक्क्यांची घसरण दिसून आलीय. 

तसंच सोनं स्वस्त झाल्यामुळे स्मगलिंगमध्येही कमी होण्याची शक्यता आहे. आयात शुल्क घटल्यानंतर स्मगलिंग बंद होण्याची शक्यता आहे. २०१३ या वर्षात सोन्याचं आयात शुल्क वाढल्यानंतर सोन्याच्या स्मगलिंगमध्येही वाढ झाल्याचं निरीक्षण निर्यातकांनी नोंदवलंय.