नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्ला

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला मोदीनी उत्तर दिलंय. मोदींनीही काँग्रेसचा समाचार घेतलाय. पटेल नसते तर आसाम पाकिस्तानात राहिले असते असं सांगत गुवाहाटीतल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 8, 2014, 08:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इम्फाळ
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला मोदीनी उत्तर दिलंय. मोदींनीही काँग्रेसचा समाचार घेतलाय. पटेल नसते तर आसाम पाकिस्तानात राहिले असते असं सांगत गुवाहाटीतल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवलाय. मणिपूर येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग ईशान्य भारतातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. मात्र, त्यांनी येथील विकासासाठी काहीच केलेला नाही. मोदींनी यावेळी पंतप्रधानांना लक्ष्य केले. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे हा प्रदेश बहरू शकला नाही, असे सांगून भाजप सत्तेत आल्यास आपण या भारतातील इतर भागांप्रमाणेच या प्रदेशाचाही विकास करू, असे आश्वासन मोदी यांनी यावेळी दिले.
अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थी निडो तानियमची दिल्लीमध्ये झालेला मृत्यू हा राष्ट्रासाठी शरमेची बाब आहे, असा शब्दांत नाराजी व्यक्त केली. भारत सरकार व दिल्ली सरकार आरोप-प्रत्यारोप थांबवून या प्रकरणी न्याय देईल, अशी मी आशा करतो, असे मोदी म्हणालेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.