'मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज'

 घुमान इथं सुरु असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज आहे असं मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.. तसंच राजकीय संमेलनं नको असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.

Updated: Apr 5, 2015, 11:18 PM IST
'मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज' title=

घुमान :  घुमान इथं सुरु असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज आहे असं मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.. तसंच राजकीय संमेलनं नको असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल उपस्थित आहेत.. या संमेलनाच्या समारोपाआधी विविध ठराव करण्यात आलेत.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधाचा ठराव यावेळी करण्यात आला.. याशिवाय घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, पंढरपूर ते घुमान आणि परतीच्या प्रवासासाठी संत नामदेव एक्स्प्रेस नावाने रेल्वेसेवा सुरु करावी असे विविध ठराव यावेळी करण्यात आलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.