टॅक्स भरला नाही म्हणून हनुमानाला नोटीस

बिहारच्या आरामध्ये महापालिकेनं चक्क हनुमानालाच टॅक्स भरायची नोटीस पाठवली आहे.

Updated: Apr 24, 2016, 07:34 PM IST
टॅक्स भरला नाही म्हणून हनुमानाला नोटीस title=

आरा: बिहारच्या आरामध्ये महापालिकेनं चक्क हनुमानालाच टॅक्स भरायची नोटीस पाठवली आहे. चार लाख 33 हजार रुपयांचा टॅक्स लवकरात लवकर भरा असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. 

या नोटीसमध्ये मंदिर ट्रस्टचं नाव टाकण्याऐवजी हनुमानाचं नाव टाकण्यात आलं आहे. हनुमानानं वारंवार नोटीस पाठवूनही महापालिकेचे चार लाख 33 हजार रुपये दिले नाहीत, अशी प्रतिक्रिया महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर ही नोटीस मंदिर ट्रस्टला पाठवण्यात आल्याचं महापौरांचं म्हणण आहे. 

हनुमानाच्या नावावर वॉर्ड नंबर 37 च्या होल्डिंग नंबर 587 मध्ये 3.17 लाख, होल्डिंग नंबर 607मध्ये 94,000 आणि होल्डिंग नंबर 624 मध्ये 22,000 रुपयांचा टॅक्स बाकी आहे, असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. तसंच दोन वेळा नोटीस दिली आहे, आता टॅक्स भरला नाही तर नाव सार्वजनिक करु असा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.