पाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन सुरूच

पाकिस्तानच्या सैन्याकडून शनिवारपासून सीमारेषेवर गोळीबार होत आहे. भारतामध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी हा गोळीबार चालू आहे. पण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा हा डाव धुळीस मिळवला आहे

Updated: May 4, 2014, 06:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जम्मू
पाकिस्तानच्या सैन्याकडून शनिवारपासून सीमारेषेवर गोळीबार होत आहे. भारतामध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी हा गोळीबार चालू आहे. पण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा हा डाव धुळीस मिळवला आहे.
पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत, पूँछमधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांच्या दिशेने शनिवारी जोरदार गोळीबार केला.
हा प्रकार पाकिस्तानने आताच नाही केलाय. तर गेल्या नऊ दिवसांमध्ये पाकिस्तान सेनेने तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराचा फायदा घेऊन काही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. पण भारताने पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, या गोळीबारात सुदैवाने भारताचा एक ही सैनिक सध्यातरी जखमी अथवा शहीद झालेला नाही. गेल्या नऊ दिवसातील हा तिसरा गोळीबार आहे. तसेच २५ एप्रिल रोजी, आधी पाकिस्तानी सैन्याकडूनच भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.