दिल्लीत भाजप खासदारांचे विरोधकांविरुद्ध निदर्शनं

दिल्लीत संसदभवनात आज न भूतो असं दृष्य दिसण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात निदर्शनं करणार आहे. भाजपानं तसं जाहीर केलंय. संसदेच्या प्रांगणात भाजपाचे खासदार आज काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहेत.

Updated: Jul 24, 2015, 01:31 PM IST
दिल्लीत भाजप खासदारांचे विरोधकांविरुद्ध निदर्शनं title=
सौजन्य: एएनआय

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: दिल्लीत संसदभवनात आज न भूतो असं दृष्य दिसलं. सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाच्या विरोधात निदर्शनं केले. भाजपानं तसं जाहीर केलं होतं. संसदेच्या प्रांगणात भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन केलं.

दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशऩाचे पहिले तीन दिवस पाण्यात गेलेत. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी वारंवार इशारा देऊनही गोंधळ सुरूच राहिलाय. आज चौथ्या दिवशी तरी कामकाज होतं का, याकडे लक्ष लागलंय... मात्र काँग्रेसनं सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. 

दुसरीकडे सत्ताधारी पक्षही अध्यक्षांचे आदेश मोडण्यात मागे नव्हता. भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी रॉबर्ट वडेरांच्या विरोधात पोस्टरबाजी केली. यामुळं काँग्रेसचा तिळपापड झाला असतानाच आज वडेरांच्या विरोधात हक्कभंग येण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, लोकसभेत सुरू असलेल्या आंदोलनांवरून महाजन यांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.