सेक्स रॅकेटचा भांडाफोड, सहा तरूणी सापडल्या विवस्त्र

राजस्थान पोलिस विभागाच्या एका टीमने एका घरावर छापा मारून दिवसाढवळ्या सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या घरातील शेजारच्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार करून हा सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. 

Updated: Oct 7, 2015, 08:14 PM IST
सेक्स रॅकेटचा भांडाफोड, सहा तरूणी सापडल्या विवस्त्र  title=

पाली : राजस्थान पोलिस विभागाच्या एका टीमने एका घरावर छापा मारून दिवसाढवळ्या सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या घरातील शेजारच्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार करून हा सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. 

या प्रकरणी सहा तरुणींसह दहा जणांना अटक करण्यात आली आहे. यात घराचा मालक, त्याची मुलगी आणि दोन मुलांचाही समावेश आहे. या घरात अनेक दिवसांपासून देह व्यापार सुरु होता.

या घराच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांच्या टीमने धाड टाकली. त्यापूर्वी पोलिसांनी या घराला वेढा घातला होता. प्रत्येक व्यक्तीला क्रमाक्रमाने अटक केली. यावेळी घरात असलेल्या तरुणी विवस्त्र अवस्थेत आढळून आल्या. दोन ग्राहकांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.