सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मोदींची घेतली भेट

भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2017, 01:25 PM IST
सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मोदींची घेतली भेट

नवी दिल्ली : भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय. 

सचिन- अ बिलियन ड्रीम्स या सिनेमासंदर्भात सचिननं मोदींना माहिती दिली. या भेटीनंतर सचिननं त्याचा आणि मोदींचा फोटो ट्विट केला आहे.

आपला आगामी सिनेमा सचिन अ बिलियन ड्रीम्सबद्दल मोदींना माहिती दिल्याचं आणि त्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं सचिननं ट्विटरवर म्हंटलंय. 

सचिन अ बिलियम ड्रीम्स या सिनेमात सचिनचा क्रिकेटर म्हणून प्रवास आणि त्याचं वैयक्तिक आयुष्यही दाखवण्यात आलंय. पुढच्या शुक्रवारी 26 मे ला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.