सेक्स रॅकेटचा भांडाफोड; अश्लील सामान जप्त

उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. यावेळी पाच महिला आणि दोन पुरुषांना अटक करण्यात आलीय. 

Updated: Oct 28, 2015, 08:52 AM IST
सेक्स रॅकेटचा भांडाफोड; अश्लील सामान जप्त  title=

कानपूर : उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. यावेळी पाच महिला आणि दोन पुरुषांना अटक करण्यात आलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाच ऑक्टोबर रोजी एका मुलीनं आपल्याला दोन महिलांनी जबरदस्तीनं देहव्यापारात ढकलल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. या प्रकरणाचा मागोवा घेत असताना हे एक मोठं सेक्स रॅकेट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. 

आरोपी या महिलांचा शोध घेत असताना सोमवारी हे रॅकेट रानीगंजमध्ये असल्याचं पोलिसांना माहिती समजली. रात्री उशीरा पोलिसांनी या भागात असलेल्या आरोपी महिलांच्या घरावार धाड टाकली असता पोलिसांच्या हाती सबळ पुरावे लागलेत. 

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या महिलांच्या घरातून अनेक अश्लील सामान जप्त करण्यात आलीय. सातही आरोपींविरोधात देह व्यापाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.