बिहारचे सिंघम शिवदीप लांडेंची महाराष्ट्रात बदली

बिहार पोलीस दलाचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे तडफदार आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर येत आहेत. वैयक्तिक कारणांसाठी शिवदीप लांडे यांनी तीन वर्षांकरता महाराष्ट्रात नियुक्ती करण्याची विनंती केली होती.

Updated: Oct 7, 2016, 08:14 AM IST
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेंची महाराष्ट्रात बदली title=

पटणा : बिहार पोलीस दलाचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे तडफदार आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर येत आहेत. वैयक्तिक कारणांसाठी शिवदीप लांडे यांनी तीन वर्षांकरता महाराष्ट्रात नियुक्ती करण्याची विनंती केली होती.

त्यांचा तो प्रस्ताव मंजूर झाला आहे. 2006 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे सध्या बिहारमध्ये स्पेशल टास्क फोर्सचे पोलीस अधीक्षक आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे ते बिहारमध्ये तडफदार अधिकारी म्हणून ओळखले जातात.