स्मृती इराणींच्या हस्ते पदवी स्वीकार करण्यास नकार

एका पदवीधर विद्यार्थ्यांने मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींच्या हस्ते पदवी स्वीकार करण्यास नकार दिला आहे.

Updated: Oct 18, 2015, 12:48 PM IST
स्मृती इराणींच्या हस्ते पदवी स्वीकार करण्यास नकार title=

श्रीनगर : एका पदवीधर विद्यार्थ्यांने मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींच्या हस्ते पदवी स्वीकार करण्यास नकार दिला आहे.

दादरी घटनेनंतर साहित्यिक पुरस्कार परत करण्याचं सत्र सुरु असतानाच, समीर गोजवारी नावाच्या विद्यार्थ्याने स्मृती इराणींच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

समीर गोजवारी हा कश्मीरच्या आययूएसटी विद्यापीठात शिक्षण घेतो. देशातील नागरिकांकडून स्वातंत्र्य हिरावण्याच्या सरकारचा प्रयत्न सुरु आहे, त्याविरोधात आपण हे पाऊल उचललंय, असं त्याने आपल्या फेसबुक वॉलवर म्हटलंय.

समीरला १९ तारखेला विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात पदवी प्रदान केली जाणार होती. मात्र समीरने ही पदवी स्मृती इराणींच्या हस्ते घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. समीरने २००८ मध्ये आययूएसटीमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 

दादरी हत्याकांडानंतर व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याने देशातील अनेक साहित्यिकांनी आपापले पुरस्कार परत केले आहेत. देशातील ४१ साहित्यिकांनी आतापर्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे पुरस्कार परत केले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.