फेसबूकवर मॅसेज टाकून केली आत्महत्या

वेब कॅम, वॉईस मॅसेज आणि वॉट्स अँप अशा सोशल नेटवर्किंग साईट्सना आपलं माध्यम बनवून अनेकांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकार सध्या घडत आहेत. हे अगदी फॅडच झालं आहे आणि यात भर पडले ती फेसबूकची. अशीच एक घटना घडली लखनऊमध्ये.

Updated: Jul 12, 2013, 06:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,लखनऊ
वेब कॅम, वॉईस मॅसेज आणि वॉट्स अँप अशा सोशल नेटवर्किंग साईट्सना आपलं माध्यम बनवून अनेकांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकार सध्या घडत आहेत. हे अगदी फॅडच झालं आहे आणि यात भर पडले ती फेसबूकची. अशीच एक घटना घडली लखनऊमध्ये.
‘गुड मॉर्निंग, आज माझ्या आयुष्याचा प्रवास इथेच थांबत आहे, मला सगळ्यांची खूप आठवण येईल. तुम्ही सगळे केवळ प्रार्थना करा की, कोणा दुसऱ्यावर अशी परिस्थिती येऊ नये’, असा संदेश देऊन त्याने आत्महत्या केली. लखनऊ युनिवर्सिटीमध्ये बीए करत असलेल्या सौरभने गुरुवारी सकाळी चारच्या सुमारास फेसबुकवर मॅसेज टाकला आणि त्यानंतर आपले आयुष्य संपवले.
लखीमपूरमधील फूलबेहड येथील रहिवाशी होता सौरभ. आपल्या शिक्षणासाठी तो लखनऊमधील शक्तीनगर येथे भाड्याने राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेला चांगले गुण न मिळाल्यामुळे त्याने फाशी लावून आत्महत्या केली असल्याचे समजते. आत्महत्या करण्यापूर्वी रात्री जवळजवळ चारच्या सुमारास त्याने आपला मित्र गौरव याला फेसबुकवर मॅसेज टाकून आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. मात्र गौरवने त्याचा मॅसेज सकाळी पाहिला. तोपर्यंत सौरभ या जगातून निघून गेला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या सुसाईड नोटमध्ये सौरभने जाण्यापूर्वी आपल्या घरच्यांची माफी मागून आपण स्वत: या सगळ्यासाठी दोषी असल्याचे म्हटले आहे. लखीमपूरमध्ये सौरभचे वडील, आई त्याच्या दोन भावंडांसह राहतात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सौरभला त्यांनी लखनऊमध्ये पाठवलेले होते. बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या सौरभला बीएच्या प्रथम वर्षात कमी गुण मिळालेले. यामुळे तो खुप हताश झाला होता. त्याने मरणापूर्वी आपल्या मित्रांना फेसबूकवर आपल्या आत्महत्येबद्द्ल सांगितले असल्याचे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे.
सकाळी सौरभचा मॅसेज वाचून गौरव जेव्हा त्याच्या घरी गेला तेव्हा त्याने पाहिले ते भयानक होते. सौरभ त्याच्या घरातील पंख्याला गळ्याला फास लावून लटकलेला होता. ‘सॉरी बाबा, मी जे केलं ते चुकीच केलं. यामुळे तुम्हा सगळ्यांना याचा खुप त्रास होईल. मी बालपणात केलेल्या चुका माफ करा. मी आता काही नाही करु शकत, मी हरलोय.’ असं लिहून सौरभने या जगातून अखेरचा श्वास घेतला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.