विद्यार्थ्यांना घरी बोलावून शिक्षकाचे अश्लिल चाळे

बडवानी (मध्यप्रदेश): बडवानी जिल्ह्यातील खेतीया गावात परीक्षेत चांगले मार्क देतो सांगून आपल्या घरात बोलवून अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Jan 19, 2016, 04:21 PM IST
विद्यार्थ्यांना घरी बोलावून शिक्षकाचे अश्लिल चाळे  title=

बडवानी (मध्यप्रदेश): बडवानी जिल्ह्यातील खेतीया गावात परीक्षेत चांगले मार्क देतो सांगून आपल्या घरात बोलवून अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

नववीत शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना दिनेश माळी या जवळच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने इंग्रजी विषयात चांगले मार्क देतो असे आमिष दाखवून आपल्या घरी बोलावले आणि त्यांच्याशी काही दिवस अश्लील चाळे केले.

घरी कोणाला याविषयी सांगितले तर मात्र परीक्षेत नापास करू आणि जीव घेऊ, अशी धमकी त्याने या विद्यार्थ्यांना दिली. म्हणून अनेक दिवस हे विद्यार्थी गप्प राहिले. पण नंतर मात्र या शिक्षकाचे बिंग फुटलेच.

पोलिसांनी दिनेशला अटक करून बडवानी न्यायालयात उपस्थित केले जिथे न्यायालयाने त्याला काही दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान शाळेनेही दिनेशला ताबडतोब नोकरीवरून काढले आहे.