दहशतवाद्यांना सहयोग करणाऱ्या ३ हजार मौलवींना अटक

पेशावर हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात मोर्चा खोलत पाकिस्तान सरकारने एकदा पुन्हा जोरदार कारवाई सुरू केली आहे. यात सुमारे ९ हजार संशयीत दहशतवाद्यांना अटक केली आहे. 

Updated: Jan 27, 2015, 07:50 PM IST
दहशतवाद्यांना सहयोग करणाऱ्या ३ हजार मौलवींना अटक  title=

पेशावर : पेशावर हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात मोर्चा खोलत पाकिस्तान सरकारने एकदा पुन्हा जोरदार कारवाई सुरू केली आहे. यात सुमारे ९ हजार संशयीत दहशतवाद्यांना अटक केली आहे. 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुमारे ३ हजार मौलवींचा समावेश आहे. या सर्वांवर मदरसा आणि इतर ठिकाणी दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा संशय आहे. 

इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानात सध्या दहशतवाद्यांविरोधात नॅशनल अॅक्शन प्लान अंतर्गत देशभरात कारवाई सुरू केली आहे. 

यात पाकिस्तान लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात अभियान सुरू केले आहे. यात पंजाब, खैबर-पख्तूनख्वा आणि इस्लामाबादात विविध मदरसा आणि मशीदींमधील ३१०० मौलवींना अटक करण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.