पॅरीस हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्देल हमिद याला कंठस्नान

पॅरीस हल्ल्याचा संशयित मास्टरमाईंड अब्देल हामिद अबाऊद याला ठार करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांच्या छाप्यादरम्यान मारल्या गेलेल्या लोकांमध्ये अब्देल याच्या मृतदेहाची ओळख पटलीय.

Updated: Nov 19, 2015, 08:51 PM IST
पॅरीस हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्देल हमिद याला कंठस्नान title=

पॅरीस : पॅरीस हल्ल्याचा संशयित मास्टरमाईंड अब्देल हामिद अबाऊद याला ठार करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांच्या छाप्यादरम्यान मारल्या गेलेल्या लोकांमध्ये अब्देल याच्या मृतदेहाची ओळख पटलीय.

अभियोजक कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, 'अब्देल हामिद अबाऊद याची पॅरीसच्या उत्तर उपनगरात बुधवारी पोलिसांच्या छाप्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये औपचारिक स्वरुपात ओळख पटवण्यात आलीय'.

अधिक वाचा - रशियाचं विमान कसं उडवलं 'आयसिस'नं केलं प्रसिद्ध

बेल्जियमचा रहीवासी जिहादी अबाऊद दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा वरच्या स्तरावरचा कमांडर होता. गेल्या शुक्रवारी पॅरिसमध्ये झालेल्या क्रूर हल्ल्याचा कट रचण्यामध्येही त्याचा हात होता. अब्देलच्या काही निशाण्यांवरुन त्याची ओळख पटवण्यात आलीय. 

पॅरीसच्या पोलिसांच्या एका तुकडीनं सेंट डेनिसमध्ये एका अपार्टमेंटमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात सुरु केलेल्या अभियानानंतर दोन मृतदेह ताब्यात घेतलेत. 

यापूर्वी, एका महिलेनं स्वत:ला स्फोटकांनी भरलेल्या जॅकेटसहीत उडवून आत्मघातकी हल्ला केल्याचं अभियोजकनं सांगितलं होतं तर सापडलेला दुसरा मृतदेहाची संपूर्णत: गोळ्यांनी चाळण झाली होती.. त्याची ओळख पटवणं कठिण होऊन बसलं होतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.