पाहा ट्रेलर : सुपरमॅन वि. बॅटमॅन दोन सुपर हिरोची दुश्मनी

आपण आतापर्यंत एका सुपर हिरोला वाईट प्रवृत्तींशी लढताना आणि त्यांचा खात्मा करताना पाहिलं असेल पण दोन सुपर हिरो एकमेकांविरूद्ध लढताना कधीच पाहिले नसतील...

Updated: Feb 15, 2016, 03:22 PM IST
पाहा ट्रेलर : सुपरमॅन वि. बॅटमॅन दोन सुपर हिरोची दुश्मनी title=

मुंबई : आपण आतापर्यंत एका सुपर हिरोला वाईट प्रवृत्तींशी लढताना आणि त्यांचा खात्मा करताना पाहिलं असेल पण दोन सुपर हिरो एकमेकांविरूद्ध लढताना कधीच पाहिले नसतील...

पण हॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच बॅटमॅन विरूद्ध सुपरमॅन असा संघर्ष दाखविला जाणार आहे. लवकर प्रेक्षकांच्या भेटीला हा संघर्ष येणार आहे. 

जगभरात सुपरमॅनचे जसे चाहते आहेत, तसेच बॅटमॅनचेही आहेत. आता या दोघांमध्ये कोण जिंकत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या ११ तारखेला यूट्यूबवर टाकल्यावर जगभरातील १ कोटी ३० लाख ५६ हजार ७९४ जणांनी भेट दिली आहे. तुम्ही पाहिला आहे का हा व्हिडिओ...

पाहा बॅटमॅन वि. सुपरमॅनचा ट्रेलर