रणबीर-कतरिनाबद्दल बोलली करीना

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाला असला तरी त्याबद्दल कतरिना कैफ आणि रणबीर कपूर किंवा कपूर कुटुंबातल्या कोणीही काहीच वक्तव्य केलं नव्हतं. 

Updated: Feb 26, 2016, 01:40 PM IST
रणबीर-कतरिनाबद्दल बोलली करीना title=

मुंबई: रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाला असला तरी त्याबद्दल कतरिना कैफ आणि रणबीर कपूर किंवा कपूर कुटुंबातल्या कोणीही काहीच वक्तव्य केलं नव्हतं. 

पण आता मात्र या दोघांबाबत रणबीरची बहिण आणि अभिनेत्री करीना कपूरनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत रणबीर माझ्याबरोबर बोलला असला तरी या कौंटुंबिक गोष्टी आहेत, याबाबत मी मीडियामध्ये बोलणार नाही. मी माझ्या भावावर प्रेम करते, त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात हीच माझी अपेक्षा आहे, असं करीना म्हणाली आहे.