पाहा नागराजला लहानपणी काय व्हायचं होतं?

ग्रामीण भागातल्या मुलांना आजूबाजूला जेवढं दिसतं तेवढंच त्यांचं स्वप्न असतं, असंच नागराज मंजुळेच्या बोलण्यावरून दिसतंय. 

Updated: May 19, 2016, 02:04 PM IST
पाहा नागराजला लहानपणी काय व्हायचं होतं? title=

मुंबई : ग्रामीण भागातल्या मुलांना आजूबाजूला जेवढं दिसतं तेवढंच त्यांचं स्वप्न असतं, असंच नागराज मंजुळेच्या बोलण्यावरून दिसतंय. 

पण लहानपणी पाहिलेलं स्वप्न पुढे बदलत जातात, वय वाढत जातं, त्याप्रमाणे आपली स्वप्नही वाढत जातात..

नागराज मंजुळेला लहानपणी काय व्हायचं होतं, असा प्रश्न त्याला विचारल्यावर त्याने 'मला सुरूवातीला कंडक्टर व्हायचं होतं.

कंडक्टर म्हणजे एसटीचा कंडक्टर आणि नंतर वडिलांनी ट्रक घेतल्यानंतर मला ड्रायव्हर व्हावसं वाटत होतं', असं नागराजने झी मराठीच्या आम्ही सारे खवैय्ये या कार्यक्रमात सांगितलं.