इंटरपोलच्या मोहिमेचा शाहरुख खान ब्रँड अँबॅसडर

Last Updated: Thursday, August 28, 2014 - 17:01
इंटरपोलच्या मोहिमेचा शाहरुख खान ब्रँड अँबॅसडर

नवी दिल्ली:  बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान इंटरपोल मोहिमेचा ब्रँड अँबॅसडर असणारआ आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या ‘इंटरपोल‘ या पोलिस यंत्रणेने ‘टर्न बॅक क्राइम‘ मोहीम हाती घेतली आहे.

गुन्हे कसे रोखावेत यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे हा ‘टर्न बॅक क्राइम‘ या मोहिमेचा उद्देश आहे. शाहरुख खान हा या मोहिमेच्या ब्रँड अँबॅसडर म्हणून निवड झालेला पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे. 

शाहरुख खान म्हणाला, ‘ब्रँड अँबॅसडर म्हणून इंटरपोलच्या ‘टर्न बॅक क्राइम‘ या मोहिमेत सहभागी होणे हा एक खूप विशेष असा सन्मान आहे. 

महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की, मला पृथ्वीवरील कोणाचीही भीती वाटू नये. मला फक्त विधात्याची भीती असावी. 

कोणाच्या अन्यायाला मी शरण जाणार नाही. मी सत्याने असत्यावर विजय मिळवेन, असत्याचा सामना करताना मला कितीही त्रास झाला तरी तो मी सहन करेन.

आपण सर्वांनी या सुविचारावर विश्वास ठेवायला हवा. जे लोक आपल्याला भीती दाखवून त्यांना घाबरण्यास प्रवृत्त करतात अशा लोकांना यथाशक्ती रोखण्याचा आपण संकल्प करायला हवा. 

कारण जे आपल्याविरुद्ध गुन्हे करतात त्यांच्याविरुद्ध आपण एकत्र येऊन उभे राहिले पाहिजे असे मला वाटते.‘

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Thursday, August 28, 2014 - 17:01
comments powered by Disqus