ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अशक्तपणा आणि प्रकृती अस्वास्थामुळं त्यांना कालच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Updated: May 28, 2015, 03:12 PM IST
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अशक्तपणा आणि प्रकृती अस्वास्थामुळं त्यांना कालच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बॉलिवूडचे ही-मॅन अशी ओळख असलेल्या धर्मेंद्र यांनी अनेक हीट चित्रपट दिले आहेत. ड्रीमगर्ल हेमा मालिनी त्यांच्या पत्नी आहेत. त्यांना सनी देओल, बॉबी देओल, इशा देओल, आहाना देओल, विजेता देओल आणि अजेईता देओल ही सहा मुलं आहेत

यापूर्वी २०१०मध्येही धर्मेंद्र यांना अशक्तपणा आणि प्रकृती अस्वास्थामुळेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा ते चंदीगडच्या रुग्णालयात होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.