VIRAL VIDEO : पाकिस्तानी अभिनेत्रीची बॉलिवूड कलाकारांवर टीका

Last Updated: Friday, February 17, 2017 - 18:22
VIRAL VIDEO : पाकिस्तानी अभिनेत्रीची बॉलिवूड कलाकारांवर टीका

नवी दिल्ली : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्या एका जुन्या व्हिडिओनंतर आता आणखी एका पाकिस्तानी अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरताना दिसतोय. 

पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिचा बॉलिवूडच्या विविध कलाकारांवर टीका करणारा हा व्हिडिओही जुनाच आहे. या व्हिडिओत ती हृतिक रोशनपासून सलमान खानपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्यांवर जीभ सैल सोडताना दिसतेय. एका पाकिस्तानी टीव्ही शोचा हा व्हिडिओ आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, सबा ही लवकरच बॉलिवूड अभिनेता इरफान खान सोबत 'हिंदी मेडियम' या चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published: Friday, February 17, 2017 - 18:22
comments powered by Disqus