युवी अनुष्काला म्हणतो, 'ओए होए रोजी भाभी! खूबसूरत लग रही हो'

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं प्रेम प्रकरण आता सर्वांनाच ठाऊक झालंय. त्यांच्या या स्पेशल नात्याबद्दल हे दोघे आता स्पष्टपणे लोकांशी याबाबत बोलू लागले आहेत. मग, इतरांनी का मागे राहावं? 

Updated: May 14, 2015, 12:44 PM IST
युवी अनुष्काला म्हणतो, 'ओए होए रोजी भाभी! खूबसूरत लग रही हो' title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं प्रेम प्रकरण आता सर्वांनाच ठाऊक झालंय. त्यांच्या या स्पेशल नात्याबद्दल हे दोघे आता स्पष्टपणे लोकांशी याबाबत बोलू लागले आहेत. मग, इतरांनी का मागे राहावं? 

भारतीय क्रिकेट टीमचा सिक्सर किंग युवराज सिंगने अनुष्काला 'भाभी' म्हणून संबोधलंय... तेही सोशल वेबसाईटवर... युवराजने सोशल नेटवर्किंग साईट इंस्टाग्रामवर अनुष्काने शेअर केलेल्या फोटोला कमेंट केलीय. 'ओए होए रोजी भाभी! खूबसूरत लग रही हो' असं म्हणत युवराजनंही अनुष्काला डिवचलंय. 

याआधीही वर्ल्ड कपच्या सेमीफायनमधील भारताच्या पराभवाला विराट-अनुष्काला जबाबदार ठरवलं जात होतं, तेव्हा त्यावेळी युवराजने या पराभवाला अनुष्काला जबाबदार धरलं जाऊ नये. असं म्हणत तिची पाठराखण केली होती.  

अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांचा 'बॉम्बे वेलवेट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. या सिनेमात अनुष्काने रोजी नूरानाची भूमिका साकारली आहे, ज्याचं सर्वत्र खूप कौतूक केलं जातंय.

या सिनेमात दिग्दर्शक करण जोहरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं आहे. सिनेमा १५ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.