२१ आजी-माजी आमदार संपर्कात - दानवे

अन्य पक्षांचे आजी-माजी आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

Updated: Feb 5, 2015, 08:34 PM IST
२१ आजी-माजी आमदार संपर्कात - दानवे title=

नागपूर : अन्य पक्षांचे आजी-माजी आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर दानवे पहिल्यांदाच नागपुरात आले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन त्यांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजींच्या स्मृतीला अभिवादन केलं. तसंच दिक्षाभूमीवर जाऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही आदरांजली वाहिली. 

संघ मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत एकवीस आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. मात्र यात शिवसेनेचे आमदार नसल्याचं आवर्जुन सांगायलाही ते विसरले नाहीत. मित्रपक्षांमध्ये फाटाफूट करण्याची भाजपची इच्छा नसल्याचा खुलासा दानवे यांनी यावर केला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.