पुण्यातील कचरा कोंडी फोडण्याचा भाजपचा प्रयत्न

आंदोलकांमध्ये फूट पाडून कचरा कोंडी फोडण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे. फुरसुंगीतल्या भाजप समर्थकांशी चर्चा सुरू झाली आहे. कचरा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 5, 2017, 06:06 PM IST
पुण्यातील कचरा कोंडी फोडण्याचा भाजपचा प्रयत्न title=
संग्रहित

पुणे : आंदोलकांमध्ये फूट पाडून कचरा कोंडी फोडण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे. फुरसुंगीतल्या भाजप समर्थकांशी चर्चा सुरू झाली आहे. कचरा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कचराकोंडी फोडण्यासाठी आता महापालिकेत सत्ता धारी भाजपनं सुरू केलाय. फुरसुंगीतल्या भाजप समर्थकांना आंदोलनातून बाजूला करण्यासाठी त्यांच्याशी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, आणि स्थायीचे अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी चर्चा सुरू केलीय. या चर्चेला महापालिका अधिकारीही उपस्थित आहेत. 

या चर्चेनंतर फुरसुंगीतले भाजप समर्थक आंदोलक आंदोलन मागे घेतील अशी शक्यता आहे. त्यामुळे मुळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी भाजपनं वेगळीच क्लुप्ली शोधून आंदोलनावर उपाय शोधण्याचा घाट घातलाय., 

दरम्यान, पुण्यातली कचरा कोंडी बाविसाव्या दिवशीही कायम आहे. सत्ताधारी भाजपचं या प्रश्नाकडे होत असलेलं दुर्लक्ष हे यामागचं प्रमुख कारण असलं तरी, यामागे राजकीय आणि प्रशासकीय कारणंही आहेत.