केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : पवार

 केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांच्या मनात आदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला.

Updated: Aug 14, 2015, 03:15 PM IST
केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : पवार title=

उस्मानाबाद :  केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांच्या मनात आदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २० दिवसात एकदाही सभागृहात आले नाहीत. भाजपाचे नेते भगवे घालून येतात त्यांना शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही, अशी बोचरी टीका पवारांनी केली. नव्या सरकारला वर्ष झालं तरी अद्याप सूर सापडला नाही. यावेळी मोदींवर पवारांनी जोरदार टीका केली.

शेतकऱ्यांना दुष्काळाने ग्रासले आहे. त्यांच्यापुढे जनावरांना पोसायचं कसे, हा प्रश्न गंभीर झालाय. राज्य आणि केंद्र सरकार यावर काहीही मार्ग काढत. त्यामुळे शेतकरी वाऱ्यावर पडलाय. शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका, असे आवाहन पवार यांनी केलेय. तब्बल ३४ वर्षांनंतर शरद पवार आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेत. त्यांनी उस्मानाबादपासून त्याची सुरुवात केली. पवार यांच्या रॅलीचा चांगला प्रतिसाद मिळाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.