काँग्रेस, राष्ट्रवादीने वाळवंट केले, माझ्या हातात सत्ता द्या - राज ठाकरे

काँग्रेस, राष्ट्रवादीने वाळवंट केले  आहे. माझ्या हातात सत्ता द्या. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने आपल्या बाजूने कौल दिल्यास मी राज्याचे नेतृत्व करेन, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला.

Updated: Sep 30, 2014, 02:45 PM IST
काँग्रेस, राष्ट्रवादीने वाळवंट केले, माझ्या हातात सत्ता द्या - राज ठाकरे title=

अमरावती : काँग्रेस, राष्ट्रवादीने वाळवंट केले  आहे. माझ्या हातात सत्ता द्या. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने आपल्या बाजूने कौल दिल्यास मी राज्याचे नेतृत्व करेन, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला.

विदर्भातील प्रचाराला सुरूवात करताना अमरावती येथील सभेत ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज दुपारी अमरावतीत जाहीर सभा झाली.  सत्तेत आल्यास नेतृत्व करण्यास तयार असून तुम्हाला हव्या त्या गोष्टी राज्यात करेन, महाराष्ट्र घडवेन. महाराष्ट्रातील मंत्री इस्राइलमध्ये जाऊन तिथल्या शेतीची पाहाणी करतात, पण त्यांनीच या राज्याचं ओसाड वाळवंट करून टाकलयं, असा टोला त्यांनी हाणला. 

महाराष्ट्राला देशातील एक नंबरचे राज्य करण्याचे आश्वासन देणारे राजकारणी महाराष्ट्र अनेक बाबतीत पुढे असल्याची शेखी मिरवतात, मात्र राज्य कोणत्या बाबतीत पुढे आहे हेही त्यांनी सांगावे. खून, दरोडे, बलात्कार, बेरोजगारी या सर्व गुन्ह्यांत महाराष्ट्र पुढे असल्याचे सांगत राजकीय पक्ष जनतेला मुर्ख बनवत असल्याची टीका त्यांनी केली.

राज यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 

- राज ठाकरेला कौल दिलात तर राज महाराष्ट्राचे नेतृत्व करेल. 
- विकासाच्या अनेक योजना माझ्याकडे आहेत.
- मी विकासआराखडा मांडलाय.

 - मरायचे असेल तर त्यांना मारुन मारा
- आत्महत्या कशाला करायच्या?
- शेतकरी आत्महत्या करतोय. यांना याचं काहीही नाही
- माझं राज्य आल तर माझ्या महाराष्ट्रातील तरुणाला रोजगार मिळणार.
- सत्तेत आल्यास खासगी सुरक्षा एजन्सीज बंद करणार.
- बलात्कार, खून, बेरोजगारी या सगळ्यांत महाराष्ट्र नंबर एक. 
- या लोकांनी जनतेची वाट लावलेय. वेश्या बाजार मांडलाय या लोकांनी
- पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यावर राज ठाकरेंची जहरी टीका.
- काँग्रेस- राष्ट्रवादीने महाराष्ट्राचे ओसाड वाळवंट केले.
- येथे कापूस, संत्री यासंदर्भात उद्योग आणले गेले नाहीत. जे जे पिकतेय तिथे ते उद्योग आणणार.
- राज्यातील माझ्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आलाय. 
- राज्य माझ्या हातात द्या, तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देईन.
- राज्याच्या विकासासाठी महाराष्ट्राचा विकास आराखडा तयार केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.