पुणे : पुण्यातील 'लाईट ऑफ पुणे' या पेपरचे संपादक रुबेन सॅम्युअल मॅन्युअल यांनी आत्मदहन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी स्वतःला पेटवून घेतलं. लष्कर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुजावर आणि घुगे या अधिकाऱ्यांविरोधात त्यांची तक्रार होती. मात्र, या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याच्या कारणावरून त्यांनी स्वतःला पेटवून घेतलं. या घटनेत ते पन्नास टक्के भाजल्याची माहिती मिळतेय.
रुबेन सॅम्युअल यांच्याविरोधात खंडणीखोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यांना तडीपारीची नोटिसही बजावण्यात आली होती. मात्र, पोलीस वैयक्तिक आकसातून कारवाई करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.