महावीर जयंतीवरचा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत

देशात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. औरंगाबादमध्ये महावीर जयंतीला वेगळाच आदर्श घालून देण्यात आलाय. महावीर जयंतीवर होणारा अनावश्यक खर्च न करता सकल जैन समाजानं ५१ गाड्या चारा दुष्काळग्रस्त शेतक-यांना पाठवला. 

Updated: Apr 19, 2016, 06:19 PM IST
महावीर जयंतीवरचा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत title=

औरंगाबाद : देशात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. औरंगाबादमध्ये महावीर जयंतीला वेगळाच आदर्श घालून देण्यात आलाय. महावीर जयंतीवर होणारा अनावश्यक खर्च न करता सकल जैन समाजानं ५१ गाड्या चारा दुष्काळग्रस्त शेतक-यांना पाठवला. 

औरंगाबादच्या पैठण गेटमधून महावीर जयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान महावीर यांच्या जयघोषानं मिरवणुकीला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासादार चंद्रकांत खैरे, यांच्यासह माजी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. दुष्काळाच्या पार्शभूमीवर सामाजिक संदेश या मिरवणुकीच्या माध्यमातून देण्यात आला.