कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर सुरु; पहिल्याचं दिवशी 'विघ्न'

कोकण रेल्वेच्या मार्गावर आज पहिली डबल डेकर ट्रेन धावली. मात्र, पहिल्याच दिवशी या ट्रेनसमोर समन्वयाच्या अभावाचं ‘विघ्न’ उभं राहिलं.  

Updated: Aug 22, 2014, 10:30 AM IST
कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर सुरु; पहिल्याचं दिवशी 'विघ्न' title=

मुंबई : कोकण रेल्वेच्या मार्गावर आज पहिली डबल डेकर ट्रेन धावली. मात्र, पहिल्याच दिवशी या ट्रेनसमोर समन्वयाच्या अभावाचं ‘विघ्न’ उभं राहिलं.  

कोकण रेल्वेच्या मार्गावरुन पहिल्यांदाच डबल डेकर ट्रेन सुरु झालीय. लोकमान्य टिळक टर्मिनसहून रवाना झाली. ही रेल्वे ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळमार्गे  करमाळीपर्यंत धावेल. रोज सकाळी साडेपाचला ही रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनहून रवाना होईल. आज पहिल्या दिवशी प्रवाशांची गर्दी कमी होती पण गणेशोत्वाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या सर्वांना याचा मोठा फायदा होणार आहे. ही हॉलिडे स्पेशल ट्रेन आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसहून कोकणात जाण्यासाठी निघालेली पहिली डबलडेकर ठाण्यात आल्यानंतर प्रवासी संघटनेनं गाडीचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. 

प्रवाशांच्या उत्साहाला 'ब्रेक'
लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघालेल्या या ट्रेनला पहिल्याच दिवशी रोह्यात कोकण रेल्वे आणि मध्ये रेल्वेच्या वादाचा फटका बसला. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे दरम्यान असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे ही डबल डेकर ट्रेन रोह्यात तासभर रखडली. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेचा वाद प्रवाशांसाठी काही नवा नाही. मात्र, डबल डेकरचा आनंद घेण्यासाठी उत्साहात निघालेल्या प्रवाशांना मात्र या वादाचा फटका सहन करावा लागलाय.     

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.