मनसेच्या नाशिक बालेकिल्ल्यात काय होणार, भुजबळांकडे लक्ष

 नाशिकमध्ये महापौर निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलाय. आघाडीच्या नगरसेवकांची सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांसोबत बैठक झाली. या बैठकीत आघाडीचा महापौर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय झालाय. मात्र मनसेशी युती करण्याबाबत यात काही निर्णय झालाय का, याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मौन बाळगलंय.

Updated: Sep 11, 2014, 02:20 PM IST
मनसेच्या नाशिक बालेकिल्ल्यात काय होणार, भुजबळांकडे लक्ष title=

नाशिक : नाशिकमध्ये महापौर निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलाय. आघाडीच्या नगरसेवकांची सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांसोबत बैठक झाली. या बैठकीत आघाडीचा महापौर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय झालाय. मात्र मनसेशी युती करण्याबाबत यात काही निर्णय झालाय का, याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मौन बाळगलंय.

अपक्ष नगरसेवक आपल्या बरोबर असल्याचा दावा आघाडीनं केलाय. त्यामुळे उद्या होणारी नाशिकची महापौर निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.  महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये चुरस अधिक वाढली आहे. कारण या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे अपक्षांना सोबत घेऊन निवडणूक रिंगणात  उतरणार आहे. 

आज सकाळी छगन भुजबळ आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण या बैठकीत मनसेची साथ घ्यायची की नाही याबाबतचा निर्णय मात्र झालेला नाही. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं दबावतंत्राला सुरुवात केली आहे. 

लोणावळ्यातल्या झालेल्या तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीमध्ये नव्या युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. 

नाशिक पालिकेत मनसेला सर्वाधिक जागा मिळाल्यात. संख्याबळाचा विचार करता मनसेच्या खात्यात 37 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे 20 आणि काँग्रेसचे 15 नगरसेवकांची साथ मिळाल्यास 62 चा मॅजिक फिगर गाठता येणार आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.