गणेशोत्सवात मोदी फिव्हर...

(अश्विनी पवार) गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरले आहेत....त्यामुळे पुण्यातील नागरिकांसोबतच गणपती मंडळही तयारीला लागली आहेत...मात्र यावर्षीच्या गणेशात्सवात खास आकर्षण ठरणारेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखाव्यांचं....

Updated: Aug 25, 2014, 01:09 PM IST
गणेशोत्सवात मोदी फिव्हर... title=

पुणे : (अश्विनी पवार) गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरले आहेत....त्यामुळे पुण्यातील नागरिकांसोबतच गणपती मंडळही तयारीला लागली आहेत...मात्र यावर्षीच्या गणेशात्सवात खास आकर्षण ठरणारेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखाव्यांचं....

लोकसभा निवडणुकीत असणारी मोदीं लाट देशात अजून कायम आहे, त्यामुळे  देखाव्यासाठी अनेक गणेश मंडळाकडून मूर्तिकारांकडे मोदींच्या  प्रतिमेची विशेष मागणी केली जाते आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवामधील देखाव्यांमधून नेहमीच चालू घडामोडी,पौराणिक,राजकीय आणि सामाजिक अशा विविध विषयांवर नेहमीच भाष्य केलं जातं. त्यामुळेच नरेंद्र मोदींसोबतच सचिनची निवृत्ती, माळीण दुर्घटना,अंधश्रध्दा निर्मूलन अशा विविध विषयांवरील  देखावे सादर करण्याचा मंडऴांचा कल दिसून येतोय. मूर्तिकारांकडे सध्या या विषयांशी संबधीत मूर्तींची मागणी वाढलीये. पुण्यातील चित्रशाळांमध्येही सध्या या कामाची लगबग सुरु झाली आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.