बाळासाहेबांना उद्धवने छळलं – नारायण राणे

 बाळासाहेब ठाकरेंना त्रास देणाऱ्यांना शिवसेनेत घेणार नाही, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांना सर्वाधिक मानसिक त्रास दिला आहे, अशा शब्दांत नाराज उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. 

Updated: Jul 18, 2014, 09:13 PM IST
बाळासाहेबांना उद्धवने छळलं – नारायण राणे  title=

रत्नागिरी :  बाळासाहेब ठाकरेंना त्रास देणाऱ्यांना शिवसेनेत घेणार नाही, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांना सर्वाधिक मानसिक त्रास दिला आहे, अशा शब्दांत नाराज उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. 

पृथ्वीराज चव्हाणांवर नाराज असलेल्या राणेंनी आपली तोफ चव्हाणांवर न डागता उद्धववर डागली. रत्नागिरीत पत्रकारांशी ते बोलत होते. झी मीडियाला त्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे वस्त्रहरण करणार असल्याचे संकेत दिले होते.  ते म्हणाले, बाळासाहेबांना त्रास नाही उद्धव ठाकरेने सर्वाधिक छळले आहे. हे मातोश्रीतील नोकरांना विचार, पोलीस शिपायांना विचार किंवा मातोश्रीच्या भिंतींना विचारा... ते याची साक्ष देतील, अशी वैयक्तिक टीका राणे यांनी केली. 
उद्धव ठाकरे यांनी माझ्या विषयी बोलू नये, नाही तर अजून मी मातोश्री आणि आतल्या गोष्टी बाहेर काढेल अशी धमकीच राणे यांनी यावेळी दिली . 

'कोकणात दहशत असल्याचा उद्धव ठाकरे कांगावा करीत आहेत. भयभीत लोकं कोकण भयमुक्त काय करणार? असा प्रश्न नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. एकटा कोकण नाही आहे. खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आहे. त्याचा अभ्यास करावा. मग सीएम बनण्याची स्वप्न पाहावी, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.