दुसरे शाहीस्नान : भाविक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

दुसऱ्या शाही पर्वणीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची गर्दी वाढू लागलीय. भक्तांना आवरणं कठीण होऊ लागलंय. भाविक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की तसंच शाब्दिक बाचाबाची झालीय. 

Updated: Sep 13, 2015, 04:56 PM IST
दुसरे शाहीस्नान : भाविक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की  title=

नाशिक : दुसऱ्या शाही पर्वणीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची गर्दी वाढू लागलीय. भक्तांना आवरणं कठीण होऊ लागलंय. भाविक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की तसंच शाब्दिक बाचाबाची झालीय. 

दरम्यान, पुढचा कुंभमेळा मध्यप्रदेशातल्या उज्जैनमध्ये भरणार आहे. यामुळे नाशकात प्रशासनानं कशी व्यवस्था केलीय. काय यंत्रणा उभारण्यात आल्यात याचा अभ्यास करण्यासाठी मध्य प्रदेशातील मंत्र्यांनीही नाशकात हजेरी लावली.

कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या दुसऱ्या पर्वणीच्यावेळी झालेल्या गर्दीमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये नियोजन कोलमडले आहे. आखाड्यांचे साधू-महंत आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणेच कुशावर्त कुंडावर स्नान केले. 

पहिल्या शाहीस्नानावेळी भाविकांची गर्दी तुलनेत कमी होती. मात्र, रविवार असल्यामुळे भाविकांनी दोन्ही ठिकाणी शाहीस्नानासाठी घाटांवर आणि मिरवणूक मार्गावर गर्दी केली. त्यामुळे नियोजन कोलमडलेय.

त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटे तीन वाजल्यापासूनच विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी शाहीस्नानासाठी कुशावर्त कुंडाकडे प्रयाण केले. विविध ठिकाणी रांगोळ्या घालून आणि पुष्प सजावट करून त्यांचे स्वागत करण्यात आले. पण गर्दी जास्त असल्याने पोलिसांना नियोजन करण्यात दमछाक झालेय.

नाशिकमध्ये आखाड्यांच्या शाहीस्नानाला नियोजनापेक्षा उशीरा सुरुवात झाली. नाशिकमध्येही हजारो भाविकांनी मिरवणूक मार्गावर गर्दी केली आहे. काही आखाड्यांच्या साधू-महंतांमध्ये मिरवणुकीत सहभागी होण्यावरून वाद झाल्याचेही पाहायला मिळाला. त्यामुळे काही साधूंनी तलवारी उगारल्याचे चित्रही दिसले. 

नाशिकमध्ये मिरवणूक मार्गावर आणि घाटांवर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साधू-महंतांचे स्नान झाल्यावर नाशिकमध्ये सर्वसामान्य नागरिकांना कुंडावर स्नान करू देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.