नाशिक महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड

महापालिकेच्या महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नाशिकच्या इतिहासात पहिलांदा असे घडले आहे. महिलेची निवड होतात महिला कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 14, 2017, 12:51 PM IST
नाशिक महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड title=

नाशिक : महापालिकेच्या महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नाशिकच्या इतिहासात पहिलांदा असे घडले आहे. महिलेची निवड होतात महिला कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.

नाशिकच्या महापौरपदी महिला विराजमान झाल्याने महिला कार्यकर्त्याचा उत्साह दुनावला आणि गुलालाची उधळण करून नाशिक ढोलच्या तालावर ठेका घेऊन महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.

नाशिक महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्याने महापौर निवासस्थान रामायणवर कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा फडकवून विजयोउत्सव साजरा केला.