48 तासांत पुणे-नागपूर विमानतळही 'इबोला'साठी होणार सज्ज

'इबोला'चं थैमान भारतात धूडगूस घालता कामा नये, यासाठी मुंबई-दिल्ली विमानतळावर आंतराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना उभारण्यात आल्यात. तशाच पद्धतीच्या उपाययोजना तातडीनं पुणे आणि नागपूर विमानतळांवरही उभारण्याचे आदेश आज मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत.

Updated: Sep 10, 2014, 05:19 PM IST
48 तासांत पुणे-नागपूर विमानतळही 'इबोला'साठी होणार सज्ज title=

मुंबई : 'इबोला'चं थैमान भारतात धूडगूस घालता कामा नये, यासाठी मुंबई-दिल्ली विमानतळावर आंतराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना उभारण्यात आल्यात. तशाच पद्धतीच्या उपाययोजना तातडीनं पुणे आणि नागपूर विमानतळांवरही उभारण्याचे आदेश आज मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत.

'इबोला' संसर्गासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेसंदर्भात मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिलेत. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली होती. 

येत्या 48 तासांत पुणे आणि नागपूर विमानतळावरदेखील मुंबई आणि दिल्ली विमानतळावर उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना लागू करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले. या उपाययोजना तातडीनं उभारून करून त्याबाबतचा अहवाल येत्या 12 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारनं द्यावेत, असंही न्यायालयानं म्हटलंय. या याचिकेसंदर्भात पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. 

'इबोला'चा प्रवेश रोखण्यासाठी मुंबई विमानतळ सज्ज
परदेशातून भारतात येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करून 'इबोला' भारतात शिरण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक ती यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचा दावा, या याचिकेत करण्यात आला होता. 

यावर, राज्य सरकारनं मुंबई विमानतळावर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिलीय. - मुंबई विमानतळावर थर्मल स्कॅनर बसवण्यात आले आहेत. यामुळे, मानवी शरीराच्या तपमानातील थोडासाही फरकही सहज ओळखता येऊ शकतो. 
- प्रत्येक टर्मिनलवर पुरेसा मेडिकल स्टाफ देण्यात आलाय. त्यांच्या जोडीला तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलीय. 
- जर एखादा संशयित रुग्ण आढळला तर डॉक्टरांच्या लेखी परवानगीशिवाय त्याला प्रवेश देण्यात येत नाही. 
- याशिवाय 4 खास डेस्क इबोलासाठी उभारण्यात आलेत. जिथे प्रशिक्षित नर्सेस तैनात करण्यात आल्यात.  
असं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलंय. यावर कोर्टानंही समाधान व्यक्त केलंय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.